डॉ. सुभाष आठले - लेख सूची

भारतीय राज्यघटना – एक सामाजिक करार

आपल्या राज्यघटनेद्वारे आपण आपल्या राज्यशासनाला काही अधिकार दिलेले आहेत. उदाहरणार्थ, आमच्याकडून म्हणजे सर्व जनतेकडून कर वसूल करणे, पोलीसदल आणि इतर यंत्रणांमार्फत दमनशक्ती आणि दंडशक्ती वापरणे, काही वेळा आम्हाला तुरुंगात टाकणे, क्वचित् प्रसंगी आम्हाला फाशीची शिक्षा देणे, आमची मालमत्ता जप्त करणे, वगैरे. या शासनाला दिलेल्या अधिकारांच्या बदल्यात आम्हाला शासनाकडून काही गोष्टी अपेक्षित असतात. उदाहरणार्थ, आम्हाला परस्परांपासून …

वातावरणबदल लढ्यातील अडचणी आणि अडथळे

१. आपण व्यक्तिशः किंवा गाव-शहर पातळीवर कार्बन डायॉक्साईडचे आणि मिथेनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो हे खरे आहे. पण शासनाने त्या दिशेने प्रयत्न केले नाहीत तर आपले प्रयत्न फारच अपुरे पडतील व त्यांना आवश्यक ते यश मिळणार नाही. उदाहरणार्थ मारे आपण विजेवर चालणारी वाहने विकत घेतली तरी जोपर्यंत शासन कोळशावर चालणारी वीजनिर्मिती केंद्रे चालवत …

पंजाबमधील शेतीच्या समस्या

पंजाबमध्ये सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल गेल्या महिन्यात वृत्तपत्रे, नियतकालिके आणि सोशल मीडिया यांच्यामध्ये भरपूर लेख, पत्रे वगैरे येऊन पुरेसे चर्वितचर्वण झालेले आहे. तरीही ज्यांच्याकडे थोडेसे दुर्लक्ष झालेले आहे असे मुद्दे पुढे मांडत आहे. १. लोकसंख्या वाढ १९४७मधील भारताच्या ४० कोटी लोकसंख्येपासून आजपर्यंत १३८ कोटीपर्यंत संख्या वाढली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची संख्यादेखील तिप्पट वाढली आहे. आज शेतीवर …

दूध आणि वातावरणबदल

वातावरणबदलामुळे मानवी अस्तित्व धोक्यात येणार आहे याची आता सर्वांना कल्पना आली आहे. त्यामुळे हवेतील कार्बन-डायऑक्साइड आणि मिथेन कमी करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सरकारने यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत हे खरे आहे. पण व्यक्तिशः आपणही त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण काय केले असता वातावरणातील ग्लोबल वॉर्मिंग गॅसेसचे प्रमाण व उत्सर्जन कमी …

पत्रोत्तर – व्हायरस असा कसा? प्राची माहूरकर ह्यांच्या लेखावर सुभाष आठले ह्यांचे उत्तर

प्राची माहूरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये ‘मेकॉलेने तसे भाषण केलेच नव्हते, जीएम फूडमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही व शेतीमध्ये वापरली जाणारी खते, जंतुनाशके किंवा इतर प्रकारची रसायने यांमुळे कॅन्सर होत नाही’ असे जे माझे प्रतिपादन होते ते कोठेही नाकारलेले नाही, त्याअर्थी या तीन गोष्टींना त्यांची संमती आहे असे धरून चालायला हरकत नाही. प्रथम जीएम फुड्स …

वृक्षारोपणाचा ज्वर

सध्या महाराष्ट्रात तरी वृक्षप्रेमाच्या भावनेचा महापूर आला आहे. भारतीय मनोवृत्ती मुळातच भावनेच्या आहारी जाऊन प्रत्यक्ष फायदा- तोटा यांचा विवेक हरवून बसण्याची आहे. त्यात विविध प्रसारमाध्यमांची भर पडल्यामुळे सर्व समाजाला वृक्षप्रेमाचा ज्वर चढला आहे. त्यामुळे अवास्तव खर्च, वाया जाणारे श्रम, वाढती गैरसोय, भूगर्भातील पाणी कमी होणे व काही वेळा हकनाक मृत्यु हे सर्व दोष निर्माण होत …

मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस

मेकॉले, जीएम फूड्स आणि कॅन्सर एक्स्प्रेस हे वाचल्यावर ‘श्वा, युवा, मघवा’ची आठवण होते ना? यातल्या दुसऱ्या त्रिकूटाला व्याकरणाच्या नियमांनी एकत्र आणले, तर पहिल्या त्रिकूटाला खोट्या माहितीने (disinformation) एकत्र आणले. मेकॉलेने २ फेब्रुवारी १८३५ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय शिक्षणधोरणाविषयी केलेल्या एका भाषणाचा व्हायरस कोणीतरी मराठीलिखित माध्यमामध्ये सोडून दिला. ह्या तथाकथित भाषणाचा सारांश असा : ब्रिटिश राज्य …

बीज-स्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे ?

मानवी प्रगतीचा एक अर्थ असा लावता येतो की अन्न, वस्त्र, निवारा वगैरे मूलभूत गरजा भागविणआाठी करायला लागणाऱ्या कष्टांचे प्रमाण आणि कष्टांचा/कामाचा कालावधी कमी-कमी होत जाणे, आणि उपभोगाचा किंवा रिकामपणाचा कालावधी वाढत जाणे. या प्रगतीची महत्त्वाची साधने दोन होती – एक म्हणजे परस्परांना मदत, सहकार्य आणि स्पेशलायझेशन. दुसरे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. सहकार्यः एकट्याने शिकार करण्यापेक्षा अनेकांनी …

सर्वांसाठी आरोग्यसेवा

डॉ. अनंत फडके यांचा आ.सु.डिसेंबर 2011 मधील सर्वांसाठी आरोग्यसेवा हा लेख वाचल्यावर त्याविषयीच्या प्रतिक्रिया मांडाव्या वाटतात. 1) उपचारपद्धती ज्याप्रमाणे ‘एव्हिडन्स बेस्ड’ हवी. म्हणजे अनभवांवर आधारित हवी, त्याप्रमाणेच आरोग्यव्यवस्थेबद्दलची धोरणेदेखील पूर्वानुभवांवर आधारित हवी. आजपर्यंतचा अनुभव असा आहे – अ) शास्त्रीय वैद्यक महाविद्यालयांशी (अॅलोपॅथिक मेडिकल कॉलेज) संलग्न असलेली, रुम्णालये चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवू शकतात. उदा. मुंबईची …

अणुऊर्जा अपघात भरपाई बिल २०१०

भोपाळ दुर्घटनेबद्दलच्या न्यायालय-निर्णयानंतर विरोधी पक्षांनी सिव्हिल लाकॅबिलिटी फॉर न्यूक्लीयर डॅमेज बिल २०१० च्या विरुद्ध रान उठवायला सुरुवात केली आहे. हे अणुऊर्जा अपघात नुकसान-भरपाई बिल सध्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरील पार्लमेंटरी स्टैंडिंग कमिटीपुढे विचारात आहे. या बिलाबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत, त्या अशा: १. रु.५०० कोटींची नुकसानभरपाईची मर्यादा फार तोकडी आहे. २. या बिलानुसार खराब सामुग्री देणाऱ्या परदेशी …

‘अमेरिकन शेती’ अंकाविषयी

[कोल्हापूरच्या सुभाष आठल्यांनी अमेरिकन शेतीच्या इतिहासाबाबतचा लेख केंद्रस्थानी ठेवून रचलेल्या जाने, २०१० (अंक XX-१०) या अंकाविषयी एक लेख व पत्र पाठविले आहे. पत्रातील काही भाग असा — अंक Evidence Based असण्याऐवजी अभिनिवेशजन्य वाटला. न घडलेल्या घटना घडल्या म्हणून रिपोर्ट करणे असे या क्षेत्रांत, विशेषतः जागतिकीकरणाचे परिणाम, सेंद्रिय उत्पादने, जनुकबदल पिके, यांच्या संदर्भात हे घडत आहे. …

‘अमेरिकन शेती’ अंकाविषयी

[कोल्हापूरच्या सुभाष आठल्यांनी अमेरिकन शेतीच्या इतिहासाबाबतचा लेख केंद्रस्थानी ठेवून रचलेल्या जाने, २०१० (अंक XX-१०) या अंकाविषयी एक लेख व पत्र पाठविले आहे. पत्रातील काही भाग असा — अंक Evidence Based असण्याऐवजी अभिनिवेशजन्य वाटला. न घडलेल्या घटना घडल्या म्हणून रिपोर्ट करणे असे या क्षेत्रांत, विशेषतः जागतिकीकरणाचे परिणाम, सेंद्रिय उत्पादने, जनुकबदल पिके, यांच्या संदर्भात हे घडत आहे. …

पिसाळलेले म्हणा आणि गोळी घाला !

“कॉल ए डॉग मॅड अँड शूट इट” अशी म्हण इंग्रजीत आहे. याचा अर्थ असा की कुत्र्याला मारायचे आहे ना? मग तो पिसाळलेला आहे असे म्हणा, आणि त्याला गोळी घाला. जनुकबदल पिकांबद्दल (genetically modified crops) हेच चालू आहे. भीती पसरवण्यात आनंद मानणारा एक तथाकथित पर्यावरणवादी/समाजवादी/पुरोगामी म्हणवून घेणारा कंपू भारतात कार्यरत आहे. त्यांनी का कोण जाणे पण …

विवेक आणि नीति यांच्यात विरोध?

बरोबर काय आणि चूक काय, न्याय्य आणि अन्याय्य, चांगले आणि वाईट, यांची समज किंवा ज्ञान माणसाला, उपजत बुद्धीनेच मिळतात, असे मला वाटते. जन्मानंतरच्या संस्कारांनी व शिक्षणाने या समजेत आणि ज्ञानात भर क्वचित् आणि थोडीच पडते. उलट संस्कारांनी आणि शिक्षणाने या संकल्पना पूर्णपणे उलट्या किंवा विकृत होण्याची शक्यता खूपच असते-विशेषतः धार्मिक संस्कारांनी, उदाहरणार्थ दोन शतकांपूर्वी सवर्ण …

धर्मांतराविषयी

[धर्मांतर आणि त्याला विरोध करण्यातून उद्भवलेली हिंसा आज अनेक प्रांतांना, देशांना छळते आहे. ५ ऑक्टो. २००८ या लोकसत्ता त सुधींद्र कुळकर्णी (अनुवादः स्वा. वि. ओक) यांचा धर्मांतरावर चर्चा का नाही? हा लेख होता. त्याचा महत्त्वाचा अंश असा] देशात विविध ठिकाणी चर्चेसवर तसेच ख्रिश्चन समुदायावर होत असलेल्या हिंसक हल्ल्यांचे समर्थन कुणीही विचारी भारतीय नागरिक करणार नाही. …

धक्का देणारी विधाने

पूर्वीच्या काळी वंशावरून माणसांना कमी दर्जाचे ठरवून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. आजदेखील तसे अजून चालू असेल. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना मानवी व्यवहाराचे मानदंड म्हणून स्वीकारण्यात आले. कोणताही मानव-समूह समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना लायक आहे असे सिद्ध करण्यासाठी मग विविध देशांत राहणारे मानवसमूह हे बौद्धिक, वैचारिक व नैतिक क्षमतेच्या बाबतीत समान …

राजकीय व अर्थविषयक व्यवस्था : काही विचार व सूचना (लेख-२)

राष्ट्रनिष्ठेत/समाजनिष्ठेत वाढ करण्यासाठी करावयाच्या गोष्टी १. समाजाकडून व्यक्तीला/कुटुंबाला मिळणारे फायदे आणि सोयी सशर्त (कंडिशनल) असाव्या. कायदे व नियम मोडणाऱ्या व्यक्तींना हे फायदे व सोयी मिळणे लगेच, त्वरित बंद झाले पाहिजे, म्हणजे समाजाची नापसंती त्या व्यक्तीस व कुटुंबास लगेच जाणवली पाहिजे. अर्थात औपचारिक न्याययंत्रणा खूप सुधारली पाहिजे. यामध्ये अनावश्यक कायदे, अंमलात न आणण्यासारखे कायदे रद्द केले …

राजकीय व अर्थविषयक व्यवस्था : काही विचार व सूचना (लेख-१)

१. मूल्येन्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांवर कोणतीही मानवी व्यवस्था आधारलेली असावी. त्यामधील न्याय हे मूल्य सर्वात महत्त्वाचे आहे. कारण फक्त न्याय हे एकच तत्त्व घेतल्यास त्यातून स्वातंत्र्य व समता या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात आपोआप विकसित होतात. न्याय म्हणजे फक्त कायद्याचे बंधन व पालन या अर्थाने नाही, तर मूलभूत अर्थाने न्याय हे तत्त्व …

भारतीय संस्कृती व स्टेम सेल्स

भारतीय संस्कृती आणि स्टेम सेल्स या सकृद्दर्शनी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी शीर्षकात एकत्र गुंफल्या आहेत. “ वा, युवा, मघवा” प्रमाणेच हे वाटेल, पण मी काही ‘पाणिनी’ असल्याचा दावा करीत नाही. त्यामुळे या दोन्हीमधील ‘अ-व्याकरणीय’ संबंध सिद्ध करण्याची जबाबदारी मी अर्थातच स्वीकारतो. पण त्यापूर्वी या दोन्ही गोष्टींच्या मला अभिप्रेत असलेल्या व्याख्या किंवा अर्थ स्पष्ट करणे योग्य …

वैद्यकीय व्यवसाय

१० वैशिष्ट्ये —- इतर व्यवसायांपेक्षा वैद्यकीय व्यवसाय वेगळा आहे. (१) मानवी शरीर हे बऱ्याच वेळा स्वतःची दुरुस्ती स्वतःच करणारे यंत्र आहे. सर्दी-पडसे-फ्ल्यू पासून क्षयरोग, विषमज्वर, हिवताप अशा रोगांपर्यंत बऱ्याच रोगांपासून शरीर आपले आपणच बरे होत असते—-बहुतेक वेळा. सण अज्ञानामुळे नक्की आपोआप बऱ्या होणाऱ्या रोगांसाठी देखील उपचारकाकडे जात असतो. त्यामुळे काहीही उपचार केले तरी सण बराच …

भारतीय तत्त्वज्ञान आणि आपले जीवन

माझ्या मित्राचा भाऊ मुंबईला असतो. ५९ वर्षाचा आहे. बी.ए. झाला आहे. नेव्हीत ११ वर्षे नोकरी, त्यानंतर १५ वर्षे मुंबईला नामांकित खाजगी कंपनीत सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नोकरी व सध्या लेबर कॉन्ट्रक्ट घेणे, व एका कंपनीसाठी मुदत ठेवी गोळा करणारा एजंट म्हणून काम करणे—असा आतापर्यंत विविध प्रकारचा अनुभव गाठीस आहे. स्वतःचे घर आहे. बायको स्वतःच्या वेगळ्या जागेत …

स्त्री: पुरुष प्रमाण

२००१ साली झालेल्या जनगणनेनुसार सर्वच भारतात व विशेषतः काही राज्यांत दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ९२७ इतकी कमी झाली आहे व आणखीच कमी होत चालली आहे. त्यामुळे समाजाचे काही मोठे नुकसान होणार आहे, या कल्पनेने भयभीत होऊन अनेक व्यक्ती धोक्याची घंटा वाजवत आहेत. समाजातील स्त्रियांची संख्या कमी होणे याचा अर्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात स्त्री-हत्या …

उपजत प्रवृत्ती

आजचा सुधारक मधील लेखनात ‘उपजत प्रवृत्ती’ (Instinct) या मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे पूर्ण दुर्लक्ष होते आहे असे वाटते. मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या बुद्धी व भावना या दोन घटकांकडे आजचा सुधारक मध्ये पुरेसे लक्ष दिले जाते. प्राण्यांचे वर्तन प्रामुख्याने उपजत बुद्धीने ठरत असते. आई-मुलांनी परस्परांना ओळखण्याच्या क्रियेपासून पिलांना पाजणेभरवणे, घरटे बांधणे, काय खावे काय …

किडनी मिळेल का हो बाजारी?

एखाद्या व्यक्तीने पैशासाठी किडनीची विक्री केली अन्य एका व्यक्तीने स्वतःसाठी किंवा मुलीसाठी किडनी खरेदी केली, किंवा अन्य एका व्यक्तीने या व्यवहारात दलाल म्हणून काम केले, किंवा एका सर्जनने विकलेली किडनी काढण्याचे व विकत घेतलेली किडनी बसवण्याचे काम केले, असे ऐकल्यावर सर्व साधारण नागरिकाला सात्विक/नैतिक संताप येतो. हा संताप नुसताच अनाठायी नाही तर अन्यायकारक ही आहे …

जागतिकीकरण व मानवसमूह

माणूस हा एक सस्तन प्राणी आहे. म्हणून जीवशास्त्राचे मूलभूत नियम माणसाला लागू पडतातच. जीवशास्त्राच्या अभ्यासात पुढील नियम आपल्याला आढळतात :– १) पर्यावरणाची विविधता प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जाती-प्रजातींच्या उत्क्रांतीस व टिकून राहण्यास आवश्यक असते. ही विविधता नष्ट केल्यास, सरसकट सारखे पर्यावरण निर्माण केल्यास, अनेक जाती प्रजाती जैविक चढाओढीत मागे पडून नष्ट होतात. पर्यावरणाच्या स्थानिक वैशिष्ट्यांमुळे केवळ …

स्वदेशी? की विवेकी आयात!

स्वदेशीबद्दलची विविध ठिकाणची चर्चा ऐकताना किंवा वाचताना असे लक्षात आले, की खरा प्रश्न स्वदेशी विरुद्ध परदेशी असा नसून आयात करावयाच्या वस्तूंमध्ये/सेवांमध्ये निवड करण्याचा आहे. आपले भारत राष्ट्र हे अमेरिकेप्रमाणे (U.S.A.) श्रीमंत नाही. अमेरिकेला कोणत्याही गोष्टींची अमर्याद आयात करणे सध्या तरी परवडते. पण भारत हे गरीब राष्ट्र आहे. आयातीवर आपण अमर्याद खर्च करू शकत नाही. आपण …

दलितांसाठी आरक्षण

मागासलेपणासाठी दारिद्र्याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक कारणे असतात. घरात व भोवतालच्या समाजात शैक्षणिक वातावरण नसणे, मुलांनी शिकावे अशी तळमळ आई-वडलांना व संबंधित समाजाला नसणे हे एक महत्त्वाचे कारण मागासलेपणाला असते. तसेच उच्चवर्णीयांनी नाउमेद करणे, संधी न देणे, दडपून टाकणे हेही एक महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे आरक्षणासाठी जात हा महत्त्वाचा निकष असावा हे योग्यच आहे. मतभेद उद्भवण्याची …

अर्थ-व्यवस्था व राज्य-व्यवस्था

समाजवाद, बाजारपेठा व लोकशाही’ या अमर्त्य सेन यांच्या निबंधाचा विद्यागौरी खरे यांनी केलेला अनुवाद मार्च ९९ च्या आ.सु. मध्ये वाचला. तो वाचून काही स्पष्टीकरण करणे व काही विचार मांडणे आवश्यक वाटले म्हणून हा लेख. अर्थव्यवस्थेच्या दोन प्रमुख पद्धती आहेत –(१) भांडवलशाहीः – खाजगी उत्पादन, खाजगी व्यापार, मुक्त बाजारपेठेमध्ये मागणी व पुरवठा यांवर आधारित विनिमयाचा दर, …

पृथ्वीचा कॅन्सर

जमीन, हवा, पाणी या जड पदार्थांसह व विविध प्राणी, वनस्पती, एकपेशीय जीव, यांसह, आपली पृथ्वी हाच एक सजीव पदार्थ आहे ही कल्पना किंवा उपमा आता सर्वमान्य ठरत आहे. या पृथ्वीवरील सर्वच सजीव व निर्जीव घटक एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांवर परिणाम करतात हे आता कोठे आपल्याला समजू लागले आहे. सजीव सृष्टीच्या आगमनापूर्वी पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायु अजिबात …

नीती आणि समाज

अनेक व्यक्ती एकत्र राहतात तेव्हा समाज तयार होतो. व्यक्तींचे समूहात राहणे सुखकर व्हावे, समाज-जीवन सुरळीत चालावे व समाजाची प्रगत व्हावी यासाठी व्यक्तींनी आपल्या वर्तनावर काही बंधने घालून घेणे आवश्यक असते. किंवा दुस-या शब्दांत, समाजाने, व्यक्तीने कसे वागावे यासाठी, काही मार्गदर्शक नियम घालून द्यावे लागतात व ते नियम पाळले जातील यासाठी प्रयत्न करावा लागतो. बहुतेक सर्व …

रक्तदान व एडस् ह्यांविषयी शासकीय धोरण

रक्तदात्यांना त्यांच्या रक्त-तपासणीत दोष सापडल्यास तसे कळवावे की नाही याबद्दल वृत्तपत्रांत सध्या चर्चा चालू आहे. त्याबद्दल निर्णय घेण्यापूर्वी या प्रश्नाची व्याप्ती समजून घेतली पाहिजे. नमुन्यादाखल कोल्हापूर शहराचा विचार करू. कोल्हापूर शहरामध्ये गेल्या वर्षी २५,००० जणांनी स्वेच्छेने (त्याबद्दल आर्थिक मोबदला न घेता) रक्तदान केले. त्यापैकी ५% म्हणजे १२५० जणांचे रक्त एडस् व्हायरस युक्त, १०% म्हणजे २५०० …

विकृत संस्कार

श्रीमती कल्पना कोठारे यांनी डिसेंबर ९७ च्या आजचा सुधारक मध्ये एक चांगला लेख लिहून माझ्या लेखातील वैगुण्ये दाखवून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. पण ब्रेन-ड्रेन किंवा काही भारतीयांची पाश्चात्त्य देशांत होणारी कुतरओढ हा माझ्या लेखाचा मध्यवर्ती मुद्दा नव्हताच. माझ्या मुंबईत राहणार्याो मराठीभाषक भावाची दोन मुले अनुक्रमे सातवी व नववीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यांना प्रादेशिक भाषा …

कावळे आणि कोकिळा

कावळ्याच्या घरट्यांत कोकिळा अंडी घालते. अंडी घालताना कावळ्याची अंडी घरट्यातून बाहेर ढकलून देते. कोकिळेची अंडी लवकर फुटतात व त्यातून लवकर पिल्लू बाहेर येते. ते पिल्लू देखील सोबतएखादे कावळ्याचे पिल्लू असेल तर त्याला घरट्याबाहेर ढकलून देते. कावळा मात्र त्याला आपलेच पिल्लू समजून वाढवतो. पिल्लू मात्र वाढल्यावर सर्वार्थाने कोकिळाच होते, त्याच्यात कावळ्याचे कोणतेही गुणधर्म येत नाहीत. या …

आस्तिक/नास्तिक

नास्तिकांचे दोन प्रकार असतात. एक म्हणतात ईश्वर नाही. ते सरळ बोलत असतात. दुसरे बिरबलाप्रमाणे वक्रोक्तीने बोलतात. बिरबल म्हणतो की बादशहाचा पोपट खात नाही, पीत नाही, बोलत नाही, श्वास घेत नाही, चोच वासून उलटा पडला आहे. पण तो स्पष्टपणे “पोपट मेला आहे’ असे म्हणणार नाही. तसेच काही नास्तिक “ईश्वर निराकार, निर्गुण, निर्विकार, इंद्रियगम्य नसलेला, व सर्वव्यापी …

सुधारणा, लैंगिकता व क्लोनिंग

हे विश्व अनादि व अनंत आहे. त्याचा पसारा, त्याचे वस्तुमान, त्याचे तेज, त्याची शक्ती, त्याचे वेग, या सर्वच गोष्टी मानवी कल्पनेबाहेरच्या आहेत. गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण त्या समजू शकत नाही. या उलट अणु-रचनेचे, अणु-परमाणूंचे आकार, वेग, भ्रमणकक्षा, वस्तुमान वगैरेंची कल्पना, गणिताची मदत घेतल्याशिवाय आपण करू शकत नाही. पण ही विश्वाची अवाढव्य यंत्रणा काय किंवा अणूची …

गुणवत्ता व आर्थिक मदत/दंड

शिक्षणासाठी आर्थिक मदत करताना शासनाने (किंवा शासनाच्या आदेशाने इतरसंस्थांनी) विद्याथ्र्यांची आर्थिक स्थिती हा निकष मानावा की त्याची गुणवत्ता हा निकष मानावा याची चर्चा या लेखात केली आहे. सध्या वैद्यकीय किवा अन्य व्यावसायिक शिक्षणासाठी दोन प्रकारच्या शिक्षणसंस्थांत प्रवेश दिला जातो. पैकी अनुदानित शिक्षणसंस्थांना शासनाकडून अनुदान मिळाल्याने तेथील विद्याथ्र्यांना (यापुढील आकडे उदाहरणादाखल वैद्यकीय शिक्षणाचे आहेत) प्रतिवर्षी ४ …